मत्स्यव्यवसाय संचालनालयातर्फे या संचालनालयाच्या मच्छीमार प्रशिक्षण केंद्र, एला धावजी, जुने गोवे येथे 28 ते 30 जुलै 2016 या कालावधीत खेकडा संवर्धनावर तीन दिवसीय अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला व 29/07/2016 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र येथे फिल्ड विजिट करण्यात आली.
सागरी उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमपीईडीए, कारवार आणि आरजीसीए, केरळ येथील तज्ज्ञ खेकडा संवर्धनावर व्याख्यान देण्यासाठी आले होते. मच्छीमार युवकांना, उद्योजकांना खेकडा संवर्धन त्यांचा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. राम अधर गुप्ता, उपसंचालक (एक्वा) एमपीईडीए, एसआरसी, कारवार आणि डॉ. स्मिता मजूमदार, मत्स्यव्यवसाय अधीक्षक यांनी केले. जीवशास्त्र, पशुसंवर्धन, शरीरक्रियाशास्त्र, पर्यावरणशास्त्र/अनुवंशशास्त्र, स्पॉनिंग व प्रजनन वैशिष्ट्ये यावर श्री. मंगेश गावडे यांनी व्याख्यान दिले आणि हॅचरीमध्ये मड क्रॅब बीज उत्पादन आणि सॉफ्ट शेल खेकडा उत्पादन तंत्र, नमुने व स्टॉक मूल्यांकन, फार्म क्रॅबचे अर्थकारण आणि तलाव व खाडीवर आधारित संवर्धन यावर श्री. केदार पालव यांनी व्याख्यान दिले. गोव्यात खेकडा पालन युनिट उभारणीसाठी आर्थिक मदत यावर डॉ. स्मिता मजूमदार यांनी व्याख्यान दिले आणि श्री. टी. टी. पुंतीराजन, आरजीसीए यांनी खेकडा पालनावर व्याख्यान दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात गोव्यातील विविध ठिकाणांहून एकूण 42 सहभागी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.