ग्रीन हाऊस सोलर ड्रायिंग प्लॅटफॉर्म

ग्रीन हाऊस सोलर ड्रायिंग प्लॅटफॉर्म

खवळलेला समुद्र आणि पावसाळ्यात लागू करण्यात आलेल्या मासेमारी बंदीमुळे स्थानिक गोव्यातील लोकांच्या जेवणाच्या ताटात ताज्या माशांचा तुटवडा निर्माण होतो. पावसाळ्यात ताज्या माशांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, मासे सुकवून या हंगामात गोव्यात स्वादिष्ट पदार्थ म्हणून खाल्ले जातात. सर्वसाधारणपणे, काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी, जादा ताजे मासे रस्त्यांवर, महामार्गांवर, समुद्रकिनार्‍यांवर आणि समुद्रकिनार्‍यांजवळ इ. मोकळ्या मैदानांवर सुमारे 3-5 दिवस उन्हात सुकविले जातात, हा वेळ माशांच्या प्रकारानुसार व हवामानाच्या परिस्थितीनुसार असतो. मात्र, उघड्यावर मासे सुकविण्याची पद्धत अस्वच्छ असते कारण त्यात माश्या व इतर प्राणी आकर्षित होतात तसेच धूळ साचते.
अलीकडे, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात, मासे सुकविण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सोलर ग्रीन हाऊस ड्रायरचा वापर करण्यात येतो. याव्यतिरिक्त, काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यात आणि सुकविलेल्या अंतिम मालाला चांगला बाजारभाव मिळविण्यात हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
सोलर ग्रीन हाऊस ड्रायर ही एक पूर्णपणे पॉली कार्बोनेटेड शीट आहे जी मासे सुकविण्याच्या प्लॅटफॉर्मवर मोकळ्या भागात ठेवली जाऊ शकते. सोलर ड्रायरच्या आत न गंजणार्‍या स्टेनलेस स्टील शेल्फवर मासे सुकविले जातात. मोकळ्या जागेत मासे सुकविण्यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा निम्म्याहून कमी वेळ लागतो. पुढे, ओलावा काढून मासे सुकविले जातात आणि संरक्षित केले जातात ज्यामुळे नंतर जीवाणूंची वाढ, एंजाइमची क्रिया आणि चरबीचे रासायनिक ऑक्सिडेशन रोखले जाते. तसेच सोलर ग्रीन हाऊस ड्रायरचा वापर मसाले, फळे, भाताचे दाणे, कडधान्ये इ. सुकविण्यासाठी केला जाऊ शकतो.
मच्छीमार/उद्योजक/मच्छीमार महिला/ मत्स्यपालकांना स्वच्छ वातावरणात मासे/धान्य इ. सुकविण्याची आवड निर्माण व्हावी तसेच मच्छीमार/उद्योजक/मच्छीमार महिला/ मत्स्यपालक यांना प्रशिक्षण देणे, या उद्देशाने खात्याने एटीआर सोलर (तामिळनाडू, भारत) कडून सोलर ग्रीन हाऊस ड्रायरचे डेमो युनिट खरेदी केले आहे. सुकविण्यात येणारे मासे/धान्य यानुसार तापमान समायोजित करण्यासाठी सोलर ग्रीन हाऊस ड्रायरमध्ये तापमान आणि आर्द्रता राखण्याकरिता आवश्यक ती सर्व व्यवस्था सुद्धा बसविण्यात आली आहे. तसेच एसी/डीसी एक्झॉस्ट फॅनची तरतूदही करण्यात आली आहे.
केवळ मासे सुकविण्यासाठी, एकावेळी अंदाजे 500-600 किलोची क्षमता असलेला सोलर ड्रायर 09/02/2022 रोजी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, एला – धावजी, जुने गोवे येथे बसविण्यात येऊन सुरू करण्यात आला आहे.

green1
green2
green3