शापोरा फिशरीज कोल्ड स्टोरेज कॉम्प्लेक्स, शापोरा, बार्देश येथे प्रशिक्षण भिंत व मासेमारी जेटी आणि कुटबण जेटी, कुटबण, सासष्टी गोवा येथे फिशिंग जेटी यांच्या बांधकामासाठी पायाभरणी.
शापोरा फिशरीज कोल्ड स्टोरेज कॉम्प्लेक्स, शापोरा, बार्देश येथे प्रशिक्षण भिंत आणि मासेमारी जेटी बांधकामासाठी पायाभरणी,फेब्रुवारी 2016 रोजी, माननीय कामगार व रोजगार, मत्स्यव्यवसाय आणि अनिवासी भारतीय व्यवहारमंत्री श्री. आवेर्तान फुर्तादो यांच्या हस्ते, माननीय जलस्रोत आणि कला व संस्कृती मंत्री श्री. दयानंद आर. मांद्रेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.कुटबण जेटी, कुटबण, सासष्टी गोवा येथे प्रशिक्षण भिंतीचे बांधकाम व मासेमारी जेटीचे अद्ययावतीकरण यांची पायाभरणी28 फेब्रुवारी 2016 रोजी माननीय कामगार व रोजगार, मत्स्यव्यवसाय आणि अनिवासी भारतीय व्यवहारमंत्री श्री. आवेर्तान फुर्तादो यांच्या हस्ते आणि श्री. बेंजामिन सिल्वा, आमदार, वेळ्ळी मतदारसंघ आणि श्री. कायतानो आर. सिल्वा, आमदार, बाणावली मतदारसंघ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. दोन्ही जेटींचे काम गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित तर्फे करण्यात येईल.
मासेमारी जेटीच्या बांधकामामुळे बोटमालकांना नौकांच्या आकारमानात बदल करण्याची संधी मिळेल जेणेकरून त्यांना दूरवर मासेमारी करता येईल आणि समुद्रात जास्त काळ राहता येईल. तसेच नदीच्या मुखावरील प्रशिक्षण भिंत बोट मालकांना भरती-ओहोटीवर अवलंबून न राहता समुद्रात जाण्यास मदत करेल.

कुटबण जेटी, कुटबण, सासष्टी गोवा येथे प्रशिक्षण भिंत व मासेमारी जेटी बांधकामासाठी पायाभरणी
