ऍक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2017-18

ऍक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2017-18

खात्यातर्फे गोवा क्रीडा प्राधिकरण, कांपाल मैदान, पणजी-गोवा येथे, ऍक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2017 चे आयोजन करण्यात आले होते. हा भव्य कार्यक्रम 07 डिसेंबर 2017 ते 10 डिसेंबर 2017 असे चार दिवस पार पडला.

गोव्यातील मच्छीमार समुदायाला प्रोत्साहन देणे आणि मच्छीमार, मत्स्यपालक, उद्योजक यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून देणे व लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या फिश फेस्टिव्हल आयोजनामागचा मुख्य उद्देश होता. या महोत्सवामध्ये सीफूड स्टॉल, मत्स्यव्यवस उपक्रमांशी संबंधित व्यावसायिक स्टॉल्स, शोभिवंत मत्स्य गॅलरी, चर्चासत्रे, विद्यार्थी/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फिल्म स्क्रीनिंग आणि शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश होता.