गोव्याचा राज्य मासा

स्ट्रिप्ड ग्रे म्युलेट (Mugil cephalus) ही Mugiliformes ऑर्डर अंतर्गत Mugilidae कुटुंबातील म्युलेटची प्रजाती आहे. ती सामान्यत: जगाच्या उष्णकटिबंधीय, उपोष्णकंटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशाच्या किनारी पाण्यात आढळते. जगभरात तो एक महत्त्वाचा खाद्य मासा आहे. ती एक संभाव्य जलकृषी प्रजाती व एक गेम फिश म्हणूनही महत्त्वाची आहे. मोठे उत्सागरी व खोल समुद्रातील मासे पकडण्यासाठी त्याचा लालूच (बेट) (छोट्या आकाराचा) म्हणूनही वापर केला जातो. ग्रे म्युलेट विविध प्रकारची उपकरणे (गिलनेट, कास्ट जाळे, स्टेक जाळे, बॅरिअर जाळे, लिफ्ट जाळे, बिच सेन आणि हूक व लाईन्स) आणि होड्या (कारागिरीच्या, मोटारयुक्त व यांत्रिकी) वापरून पकडला जातो. त्याशिवाय, दक्षिण व उत्तर गोव्यातील सर्व प्रमुख, मध्यम व लघु लँडिंग केंद्रांवर म्युलेट एक मत्स्यगट म्हणून लँड केला जातो. ही प्रजाती किनारी जलकृषी व मूल्यवर्धन यासाठीही वापरली जाऊ शकते.

स्ट्रिप्ड ग्रे म्युलेट (Mugil cephalus) ज्याला स्थानिकरीत्या शेवटो म्हणून ओळखले जाते, त्याला शासकीय राजपत्र शृंखला I क्र. 40 दिनांकित 31/12/2015 द्वारे गोव्याचा राज्य मासा म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

गोव्याच्या राज्य माशावर अहवाल

गोव्याच्या राज्य माशासंबंधी राजपत्र