प्रशिक्षण नौका “OCEAN QUEEN”
मच्छिमारांना व विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी खात्याने ओशन क्वीन प्रशिक्षण नौका म्हणजेच ट्रॉलर तथा पर्स सेनर खरेदी केली होती. आधुनिक शाश्वत मासेमारी तंत्रे, नौका खराब परिस्थितीत असताना सुरक्षा उपकरणांचा उपयोग इ. बाबत प्रशिक्षण देण्यासाठी नौकेचा वापर केला जातो.

गस्त नौका “AVE MARIA-14”
खात्याने 15 मीटरची ग्लास रिइनफोर्स्ड प्लास्टिक हाय स्पीड गस्त नौका खरेदी केली, जी 2 x 330 अश्वशक्तीची आहे, वोल्वोपेंटा इंजिन जी 30 नॉट्स प्रति तास या कमाल गतीने धावते आणि 6-8 सदस्य सामावून घेऊ शकते.
ही नौका अंतर्क्षेत्रात व सागरी पाण्यात गस्त घालण्यासाठी तयार करण्यात आली आहे. गस्त नौका समुद्रात यशस्वीपणे नियमित गस्त घालत आहे आणि समुद्रात होणार्या बेकायदेशीर मासेमारी उपक्रमांना आळा घालत आहे.

