दर वर्षी 6 महिने कालावधीच्या खाते प्रशिक्षण अभ्यासक्रमात 20 मच्छीमार तरुणांना प्रति महिना रु. 1000/- विद्यावेतनासह/विद्यमान साहाय्य स्वरुपासह प्रशिक्षण दिले जाते.
पात्रता:
(a) वय: 18 वर्षे आणि वरील.
(b) अर्हता: किमान इयत्ता आठवी उत्तीर्ण.
(c) रहिवास: गोव्यात 15 वर्षे वास्तव्य.
(d) मच्छिमारांना/मत्स्योद्यागामधील व्यक्तीला आणि एससी/एसटी व्यक्तींनाही प्राधान्य दिले जाईल.
संचालनालयातर्फे उमेदवारांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय संस्था, नावीय व अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय खाते, भारत सरकार, फाईन आर्टस एव्हेन्यु, कोचीन येथे प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी आणि त्याच्या चेन्नई व विशाखापट्टणम येथील युनिट्समध्ये पुढील अभ्यासक्रमांसाठी पाठविले जाते.
(a) व्हेसेल नेव्हिगेटर अभ्यासक्रम:- अभ्यासक्रमाचा कालावधी 24 महिने.
(b) मरीन फिटर अभ्यासक्रम:- अभ्यासक्रमाचा कालावधी 24 महिने.
दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पात्रता:
- वय :- 15 वर्षे ते 20 वर्षे
- शैक्षणिक अर्हता:- इयत्ता 10 वी किंवा समतुल्य परीक्षा गणितात व विज्ञानात 40% गुणांसह उत्तीर्ण.
- शारीरिक क्षमता:- मच्छिमारी नौकांवरील दगदगीच्या कामासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. व्हेसेल नेव्हिगेटर अभ्यासक्रमाच्या बाबत, मर्कंटाईल मरीन खात्याच्या डॉक्टरांनी मान्यता दिलेली नवीन प्रवेश मानक दृष्टी चाचणी पास केली पाहिजे.
राज्य सरकारद्वारे पुरस्कृत उमेदवारांना प्रति महिना रु. 1500/- चे विद्यावेतन दिले जाईल.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र येथे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (मत्स्यव्यवसाय) मधील पदवी अभ्यासक्रमांसाठीही खात्यातर्फे उमेदवाराला पुरस्कृत केले जाते.
पात्रता:
- अर्हता:- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी यांसह 35% गुणांसह बारावी उत्तीर्ण.
- रहिवास:- गोव्यात 10 वर्षे वास्तव्य.
